धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा लेबल… भावूक होत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही दोघांनी लग्न केलं कारण…’
Hema Malini on Dharmendra Death : ‘कधीच असा विचार केला नव्हता की अशा शोक सभेचं आयोजन करावं लागेल, ते देखील पती धर्मेंद्र यांच्यासाठी…’ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी याचं हे शब्द ऐकल्यानंतर ,जमलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगायचं झालं तर, 11 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी धर्मेंद्र यांना आठवत, त्यांच्यासोबत व्यतीत केलेले खास क्षण हेमा मालिनी ताजे केले… यावेळी हेमा मालिनी यांचं अंतःकरण जड झालेलं… तर डोळ्यात पाणी होतं..
यावेळी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या 57 वर्षांच्या प्रवासाचं सुंदर वर्णन केलं. तिने धर्मेंद्र यांचं वर्णन कुटुंबातील एक सदस्य म्हणून केलं जे केवळ त्यांच्या पत्नी आणि मुलांचीच नव्हे तर हेमाच्या आई – वडिलांची देखील काळजी घेत होते. सोशल मीडियावर हेमा मालिनी यांचे काही व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.
मी माझ्या नशिबाबद्दल विचार करुन हैरान देखील होते आणि आनंदी देखील… – हेमा मालिनी
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘कधी कधी माझ्या नशिबाचा विचार करत असताना हैरान देखील होते, तर कधी आनंदी देखील असते… ज्या व्यक्तीवर मी अनेक सिनेमांमध्ये प्रेम केलं. त्याच व्यक्तीसोबत खऱ्या आयुष्यात देखील प्रेम केलं आणि लग्न केलं… आमच्यात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत होती म्हणून आम्ही लग्न केलं…’
ते माझ्यासाठी खूप समर्पित जीवनसाथी बनले – हेमा मालिनी
हेमा मालिनी म्हणाल्या, “ते एक अतिशय समर्पित जीवनसाथी बनले. ते प्रत्येक पावलावर माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या प्रत्येक निर्णयावर त्यांनी सहमती दर्शवली… माझ्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांसाठी परफेक्ट वडील झाले. दोन्ही मुलींची लग्न त्यांनी वेळेत केली… माझ्या मुली कायम मला विचारायच्या आपण त्यांना भेटायला कधी जाणार अम्मा… त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड प्रेम मिळालं… आमचे पाच नातवंड आहेत, त्यांच्यासाठी ते खूप छान आजोबा झाले…” असं म्हणत असताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं..
सांगायचं झालं तर, 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं आणि 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबियांनी शोक सभेचं आयोजन केलं होतं. पण देओल कुटुंबियांनी आयोजित केलेल्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत. ज्यांमुळे अनेक चर्चा रंगल्या. अखेर हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन केलं.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

