new years new goal 2026 - 2027
موعد مباراة المغرب والأردن بنهائي كأس العرب 2025
اقرأ المزيد على موقع إرم نيو
2026
कोल्हापूर : संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व खासदारांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हीप जारी केला आहे. या व्हीपमध्ये 15 ते 19 डिसेंबरपर्यंत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदनात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात पडद्यामागे खरंच काही सुरु आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना विचारला. त्यावर धनंजय महाडिक यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. त्यांनी नेमकं काय सुरु आहे, याबाबत सविस्तर सांगितलं नाही. पण भाजपच्या गोटात खरंच दिल्लीत पडद्यामागे काहीतरी घडत असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काहीतरी मोठी बातमी मिळणार असल्याची चर्चा आहे.
धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याला सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. यामागील टायमिंगही महत्त्वाचं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या पंतप्रधान पदाबाबत मोठा भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. येत्या 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं आहे. दुसरीकडे संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती कालच केली आहे. त्यानंतर आता खासदारांना व्हीप जारी केला आहे. यामुळे या टायमिंगला महत्त्व मानलं जात आहे.
धनंजय महाडिक काय म्हणाले?
दरम्यान, धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. "दिल्लीत काहीतरी घडतंय. पण 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे. "काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही. पण काही प्रक्रिया सुरु आहे", असंही धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे.
साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर: पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथील बिरदेव मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागील सीटवर बसलेल्या विवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री हा भीषण अपघात झाला होता. सोनाली उर्फ सोनिया शुभम कांबळे (वय 23, रा. जोतिबा मंदिरामागे, बुवाचे वाठार, ता. हातकणंगले) असे मृत तरुणीचे नाव असून, अपघातात तिचा दीड वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. जखमी झालेल्या दुचाकी चालक मोहसिन पिंजारी यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री बुवाचे वाठार येथील मोहसिन पिंजारी हे त्यांच्या दुचाकीवरून कोल्हापूरला गेले होते. त्यांच्यासोबत सोनाली कांबळे आणि तिचा लहान मुलगा रोहन राजू कांबळे या देखील होता. तिघे बुवाचे वाठारकडे परतत असताना पुणे–बंगळुरू महामार्गावरील टोप गावाच्या हद्दीत असलेल्या बिरदेव मंदिरासमोर ट्रक (क्र. MH-14 HF-8651) ने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील तिन्हीजण रस्त्यावर फेकले गेले. धडकेनंतर सोनाली ट्रकच्या मागील चाकात ओढली गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
उपचारादरम्यान सोनालीचा मृत्यू..
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा सोनालीचा मृत्यू झाला. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून ट्रकचालक विनोद लिंबादास ओव्हाळ (वय 34, रा. बालाजी नगर, भोसरी, पुणे) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीपीआर परिसरात गोंधळाचे वातावरण..
अपघातानंतर सीपीआर रुग्णालयात सोनालीच्या सासर-माहेरच्या नातेवाईकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळाने हाणामारीही झाल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. सोनालीचा पती शुभम कांबळे यालाही काही नातेवाईकांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे बुवाचे वाठार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोनालीच्या मृत्यूने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : स्वार्थ आणि स्पर्धेच्या काळात माणुसकी हरवत चालली असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जनावरांनीच प्रेम, ममता आणि सहानुभूतीचा खरा धडा दिला आहे. आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात घडलेल्या या घटनेने सर्वांच्याच मनात भावनांचा ओलावा निर्माण केला आहे. शांताबाई यादव यांच्या घरी पाळीव मादी श्वानने एका कमजोर शेळीच्या पिलाला आपले दूध पाजत त्याला जीवनदान दिले आहे.
दुबळ्या पिलाची वेदना आणि मादी श्वानची माया
काही दिवसांपूर्वी शांताबाई यादव यांच्या शेळीला तीन पिलं झाली. त्यातील दोन पिल्लं सशक्त असून आईचे दूध सहज पित होती. मात्र तिसरं पिलू जन्मत:च अशक्त असल्याने आईचे दूध व्यवस्थित घेऊ शकत नव्हते. परिणामी त्याची तब्येत खालावत गेली आणि कुटुंबीय काळजीत पडले. या कठीण क्षणी घरातील मादी श्वानने परिस्थिती ओळखली. काही दिवसांपूर्वीच तिने देखील पिल्लांना जन्म दिला होता, पण ती पिल्लं लोकांनी पाळण्यासाठी नेल्याने ती एकटीच राहिली होती. त्याच मादी श्वानने ममतेने त्या कमजोर शेळीच्या पिलाला आपले दूध पाजण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वजण भावुक झाले
आई-पिलाचं अनोखं नातं
या मादी श्वानाने एकदाच नव्हे, तर दररोज त्या शेळीच्या पिलाला दूध पाजणे सुरू ठेवले आहे. आता त्या पिलाला ती जणू स्वतःचंच पिलू मानते, त्याचे रक्षण करते आणि आईच्या ममतेने त्याच्यावर प्रेम करते. आश्चर्य म्हणजे, पिल्लालाही आपल्या आईपेक्षा मादी श्वानाजवळ अधिक सुरक्षित वाटते. मायेच्या या नात्याने अर्दाळ गाव आणि परिसर भावूक झाले आहे.
समाजासाठी भावनिक संदेश
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच हजारो लोकांनी प्राण्यांमधील निस्सीम प्रेमाचं कौतुक केलं आहे. “माणसांमध्ये कमी होत चाललेली माणुसकी प्राण्यांमध्ये आजही तशीच जिवंत दिसते,” असे मत ग्रामस्थ शिवाजी घराळ यांनी व्यक्त केले आहे. तर आता परिसरातील नागरिक शांताबाई यादव यांच्या घरी जाऊन हे प्रेमळ दृश्य पाहत, ममतेचा हा जिवंत धडा अनुभवत आहेत.
कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील चिखली फाट्याजवळ रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात उरुण ईश्वरपूर (जि. सांगली) येथील दुचाकीस्वार दिग्विजय दिलीप पाटील (वय 39) याचा जागीच मृत्यू झाला. या दुचाकीवर पाठीमागे बसलेले अर्णव संतोष कबुरे (वय 20) आणि अंजली श्रीकांत वडगावकर (वय 21) हे दोघे तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती.
नेमका कसा झाला अपघात?
उरुण ईश्वरपूर येथील दिग्विजय पाटील आणि अर्णव कबुरे हे दोघे अंजली वडगावकर या तरुणीला सोबत घेऊन दुचाकीवर पन्हाळ्याच्या दिशेने निघाले होते. एकाच दुचाकीवर बसून तिघेजण जात होते. मात्र चिखली फाट्याजवळ भरधाव कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या विशाळगड-कोल्हापूर एसटी बसला उजव्या बाजूला त्यांची दुचाकी धडकली. जोराची धडक बसल्याने दिग्विजय रस्त्यावर कोसळले आणि रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अर्णव गंभीर जखमी झाला, तर अंजली उडून बाजूला पडल्याने ती बचावली, मात्र तिचीही प्रकृती नाजूक आहे.
तत्काळ मदतीला धावले नागरिक
अपघातानंतर चिखली फाट्यावरील नागरिक आणि कोल्हापूरच्या दिशेने येणारे जवान आदित्य पाटील आणि शिक्षक स्वप्निल पाटील यांनी तत्काळ धाव घेतली. अंजलीला खासगी वाहनातून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दिग्विजय आणि अर्णव यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी नेले गेले. डॉक्टरांनी दोघांचीही स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आधारकार्डावरून पोलिसांनी मृत आणि जखमींची ओळख पटवली आहे.
मैत्रिणीकडे जाते सांगून घरातून निघाली होती अंजली..
दिग्विजय पाटील हे शेतकरी होते, तर अर्णव हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. अंजली ही शाहूपुरीतील नागाळा पार्क येथील डेंटल क्लिनिकमध्ये काम करते. तिने घरातून निघताना घरच्यांना मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगितले होते आणि सायंकाळी 7 च्या दरम्यान तिचे वडिलांशी फोनवर बोलणेही झाले होते. त्यानंतर हा अपघात घडला आहे. अपघातानंतर पोलिसांनी तिच्या मोबाइलवरून कुटुंबियांना कळवले. दुचाकीस्वारांसोबत तिचे नाते, प्रवासाचे उद्दिष्ट याची चौकशी सुरू आहे. मलकापूर आगाराच्या एसटी चालक प्रकाश पाटील आणि वाहक दिनेश नंदिस्कर यांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक बाबासाहेब सरवदे आणि उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
दरम्यान, या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील ओव्हरटेक आणि वेगावरील नियंत्रणाच्या गरजेवर भर देणारी घटना घडली. करवीर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद खाल्ल्यानंतर तब्बल 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारनंतर उलटी, जुलाब, पोटदुखी व मळमळ यासारखी लक्षणे दिसू लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. लहान मुले, महिला, पुरुष व वृद्धांसह आजूबाजूच्या 10 ते 15 गावांतील भक्तांना हा त्रास झाला असून, बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सांबरे गावात शुक्रवारी सकाळी दत्त जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या सोहळ्याला जवळपास दोन हजारहून अधिक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर अचानक अनेकांची तब्येत बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 100 ते 125 रुग्णांवर नेसरी ग्रामीण रुग्णालय आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, तर इतरांना कानडेवाडी, माणगाव, कोवाडसह खासगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणेवर ताण; जमिनीवर उपचार
महाप्रसादातून इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांतील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भविष्यात अशा प्रकार टाळण्यासाठी कडक नियम लागू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. तर परिसरातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या घटनेने सांबरे आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दत्त जयंतीसारख्या पवित्र उत्सवात असे संकट कोसळणे ही धक्कादायक बाब आहे. मात्र प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी बाधितांच्या पूर्ण बरे होण्यासाठी आणखी काळ लागेल.
विवाहानंतर सुरू झाला अमानुष जाच...
महेर इरफान मुजावर (22, रा. शाहूनगर, चंदूर) यांचा विवाह बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील इरफान निजाम मुजावर (वय 25) याच्याशी झाला होता. लग्नानंतर पतीच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून केली गेली. ही मागणी पूर्ण न झाल्याने महेरला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. तिला नांदायलाही घेऊन जात नसल्याने ती माहेरीच राहत होती. या सततच्या तणावामुळे असह्य होऊन तिने माहेरच्या घरी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. तिचे वडील सलीम बाबू कडगे (वय 52) हे यंत्रमागावर काम करतात आणि त्यांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडे धाव घेतली. तातडीने कोल्हापुरातील शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोल्डन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
सततचा सासरच्या मंडळींचा जाच
पोलिसांनी माहितीनुसार, विवाहानंतर महेरला सासरच्या घरी राहता आले नाही. पतीने व्यवसायासाठी पैसे मागितले, पण माहेरकडून न मिळाल्याने तिला मारहाण, अपशब्द वापरुन मानसिक त्रास दिला जात होता. ती माहेरी परत आली तरी फोनद्वारे आणि सतत भेटी घेऊन जाच कायम ठेवला. या घटनेमुळे स्थानिक भागात खळबळ उडाली असून, विवाहितांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वाढत असल्याने विवाहितांच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादांमुळे होणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र यावे, असे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापुरातील कुरुंदवाड येथे कौसर इंजमाम गरगरे (वय २८) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री उघडकीस आली होती. सुरुवातीला पोलीसांनी ही घटना आत्महत्या म्हणून नोंद घेतली आणि प्राथमिक चौकशीमध्ये आत्महत्येचे कारण कौसरच्या ‘टीईटी’ परीक्षेतील ताण असल्याचे मानले गेले. मात्र, या घटनेच्या सखोल तपासानंतर कौसरच्या आत्महत्त्येच्या मागे दुर्दैवी परंतु गंभीर कारण समोर आले आहे. ज्यामुळे या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कौसरच्या आत्महत्येवेळी पतीने प्रथमच पोलिसांशी बोलताना तिने टीईटी परीक्षेच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र, मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी यामध्ये घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यामुळे माहेरकडील लोकांनी मृतदेह स्वीकारण्यास देखील नकार दिला होता, आपत्कालीन परिस्थितीवरून पोलिस आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढली असून अखेर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
संशयित आरोपी आणि पोलिस कारवाई
याबाबत भाऊ अल्ताफ इक्बाल आवटी (रा. जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. कौसरच्या आत्महत्येविरुद्ध पती इंजमाम गरगरे, सासरे राजमहम्मद खाजा गरगरे, सासू मुमताज गरगरे आणि जाऊ समीना इलहान गरगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने कारवाई करत आरोपी पती आणि जाऊ यांना अटक केली आहे. त्यांना जयसिंगपूर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासू आणि सासऱ्याला अद्याप अटक झाली नसली, तरी त्यांच्या विरोधातही तपास सुरू असून पोलिस याबाबत तपास करत आहेत.
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक (Tarwade Bk Chalisgaon) या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एक नऊ वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. धनश्री शिंदे असं बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव आहे. धनश्रीचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आलं. या घटनेला आता तीन दिवस उलटून गेली तरीही तिचा शोध लागला नाही.
धनश्री ही तरवाडे बुद्रुक गावातील शाळेत शिकत होती. 12 डिसेंबरला शाळा सुटल्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून तिचा तीन दिवसांपासून तिचा शोध लागला नाही. त्यामुळे धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
धनश्रीच्या वडिलांनी याबाबत एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, "धनश्री सकाळी 10 वाजता शाळेत गेली. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. त्यावेळी दोन मुलं घरी आली पण ती आली नाही म्हणून तिचा शोध घ्यायला शाळेकडे गेलो. तिकडे सापडली नाही म्हणून पूर्ण गाव शोधलं, पण ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर दोघा-तिघांना सागून शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही शोध केला पण तिचा पत्ता लागत नाही."
2026 Year Lucky Zodiac Signs: सध्या 2025 वर्षातील बारावा महिना म्हणजेच डिसेंबर 2025 (October 2025) महिना सुरू आहे. याचाच अर्थ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. नवीन वर्ष 2026 (New Year 2026) हे कसं जाणार? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर 2025 हे वर्ष एक अद्भुत वर्ष ठरणार आहे. या नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे ग्रह संक्रमण पाहायला मिळतील, ज्याचा सर्व 12 राशींवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. यातील काही राशींना मोठा फायदा होईल. तर काहींना समस्यांचा सामना करावा लागेल. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी एक अद्भत वर्ष ठरेल. जाणून घ्या 2026 वर्षातील भाग्यशाली राशींबद्दल...
मेष रास (Aries Yearly Horoscope 2025)
2026 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन येईल. तुमचे तारे सूचित करतात की 2026 च्या सुरुवातीपासूनच तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल दिसून येतील. 2026 ची सुरुवात आर्थिक लाभाने होईल. चौथ्या घरात गुरूचे भ्रमण तुमच्या आयुष्यात आशादायक परिणाम आणेल. तुमचे नशीब चमकेल, तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीत नोकरी मिळण्याची मोठी शक्यता आहे. तुमचा उत्पन्नाचा आलेख वाढेल.
वृषभ रास (Taurus Yearly Horoscope 2025)
वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 वर्ष तुमच्या जीवनात काही गोड आणि काही आंबट परिणाम आणेल. येणारे वर्ष आव्हानात्मक परंतु फलदायी असेल, म्हणून 2026 मध्ये तुमचे मानसिक संतुलन राखा. मे 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आणेल. या काळात, तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष देण्याचा आणि प्रत्येक आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो. सध्या तरी शेअर बाजार किंवा सट्टेबाजीपासून दूर राहणे चांगले राहील. आरोग्याच्या दृष्टीने, हे वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य लाभ देईल
मिथुन रास (Gemini Yearly Horoscope 2025)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येईल. हे वर्ष तुमच्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी राहणार नाही. ग्रहांच्या हालचालींवरून असे दिसून येते की मिथुन राशीच्या आयुष्यात अनेक बदल आणि संधी येतील. हे वर्ष तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडू शकते. मे 2026 नंतर गुरू ग्रह अनुकूल परिणाम देईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मोठे यश मिळेल. मिथुन राशीच्या दहाव्या घरात शनि लोकांना त्यांच्या करिअरला पुढे नेण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे स्थान मिळवण्यात यशस्वी व्हाल.
कर्क रास (Cancer Yearly Horoscope 2025)
कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष तुम्हाला चांगले परिणाम देईल, जर तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न समर्पण आणि वचनबद्धतेने केले तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही काम करत राहावे आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे. 2026 च्या सुरुवातीपासून मे 2026 पर्यंत तुमच्या बाराव्या घरात गुरु तुमचा खर्च वाढवेल. त्यानंतर, तो तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल, अनुकूल परिणाम देईल. आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश करे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.